Maha TAIT Exam 2022 – अभियोग्यता चाचणी फेब्रुवारीत! New Updates
Maha TAIT Exam 2022
Maha TAIT Exam 2022 परीक्षेचा मुहूर्त अखेर फेब्रुवारीत!
Maha TAIT Exam Dates
2) त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले आहे.
3) त्याच वेळी सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
4) परंतु, डिसेंबर 2017 नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही.
5) संबंधित परीक्षा ऑनलाईन घेण्याची कोणतीही यंत्रणा राज्य परीक्षा परिषदेकडे नाही.
6) परंतु, शिक्षण विभागाशी संबंधित बाबींबाबत मार्गदर्शन, तसेच केंद्रस्तरावरील निरीक्षण या बाबी परीक्षा परिषदेच्या स्तरावरून करण्यात आल्या होत्या.
7) त्याचपध्दतीने फेब-ुवारी महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा पार पडणार आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. परीक्षेसाठी कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया शासन निर्देशानुसार पार पडेल. त्यानंतर लवकरच परीक्षेेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे-
शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
शिक्षक अभियोग्यता चाचणी होणार, बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षेस मंजुरी
शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) घेतली जाते. मात्र 2017 नंतर मागील चार वर्षांत ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने निविदा प्रक्रिया राबवून बाह्य यंत्रणेद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे.
1) यंदा फेब्रुवारी महिन्यात अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी घेण्यात येईल अशी अपेक्षा होती.
2) मात्र टीईटी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर ही परीक्षा लांबणीवर पडली.
3) खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या गुणांआधारे करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला.
4) त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले.
5) सहा महिन्यांत एकदा किंवा दरवर्षी ही परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यानंतर महाआयटी आणि राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत डिसेंबर 2017 मध्ये परीक्षा घेण्यात आली.
6) यंदा मात्र परीक्षा परिषदेकडे ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा उपलब्ध नाही.
7) त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (टेट) चे आयोजन करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या पॅनलमधून निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायची, या बाबतचा निर्णय शासन स्तरावरून होणे अपेक्षित आहे.--शरद गोसावी, प्रभारी अध्यक्ष, परीक्षा परिषद
टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार:
| टीईटी उत्तीर्ण झालेले उमेदवार | |||
|---|---|---|---|
| वर्ष | पेपर १ | पेपर २ | एकूण |
| २०१४ | २५६३ | ७०३२ | ९५९५ |
| २०१५ | १९०३ | ७०८६ | ८९८९ |
| २०१७ | ७४४५ | २९२८ | १०३७३ |
| २०१८ | ४०३० | ५६४७ | ९६७७ |
| २०२० | १०४८७ | ६१०५ | १६५९२ |
| (२०१६,२०१९ ला परीक्षा झाली नाही) | |||
| IF You Satisfied By SARKARI MAHABHARTI (Website) Please Like & Share More People (Thanks). | |||
.jpg)

